सकाळ डिजिटल टीम
आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा मैदान गाजवण्यास सज्ज झाला आहे. तो बंगळुरूमध्ये दाखल झाला असून सरावालाही सुरुवात केली आहे. विराट कोहली आयपीएल 2025 मध्ये मोठे विक्रम देखील करू शकतो.
सर्वाधिकवेळा ५० + धावांची खेळी करण्याचा डेव्हिड वॉर्नरचा विक्रम मोडण्यासाठी विराटला आणखी तीन अर्धशतकांची गरज आहे.
जर विराटने आगामी स्पर्धेत आणखी पाच झेल घेतले तर तो एबी डिव्हिलियर्सचा सर्वात जास्त ११८ झेल घेण्याचा विक्रम मागे टाकेल.
विराट कोहली त्याच्या १३००० T20 धावा पूर्ण करण्यापासून फक्त २९३ धावा दूर आहे .
विराटला आयपीएल इतिहासात १००० चौकार मारणारा पहिला खेळाडूही बनू शकतो. यासाठी त्याला 23 चौकार हवे आहेत.
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ स्पर्धा २२ मार्चपासून सुरू होणार आहे. गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी सामना करतील.