Pranali Kodre
आयपीएल २०२५ स्पर्धेत ३ मे रोजी चेन्नई सुपर किंग्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने केवळ २ धावांनी पराभूत केले.
हा सामना बंगळुरूच्या घरच्या मैदानात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला होता.
पण, हा सामना सुरू होण्यापूर्वीच बंगळुरूचे चाहते चर्चेत होते. कारण स्टेडियमबाहेर अनोख्या जर्सीचे स्टॉल दिसून आले होते.
ही जर्सी पांढऱ्या रंगाची होती आणि त्यावर काळे पट्टे होते, जसे जेलमध्ये गुन्हेगारांना जी कपडे दिली जातात तसे. त्यावर २०१६ - २०१७ असं लिहिलेलं होतं.
त्यामुळे यातून चेन्नईला २०१६ - २०१७ हंगामाची आठवण करून देत असल्याचे स्पष्ट होते.
२०१६ - २०१७ या दोन हंगामात चेन्नईला अवैध बेटिंगप्रकरणी बंदीचा सामना करावा लागला होता. साल २०१३ साली तत्कालीन अधिकारी गुरुनाथ मय्यपन या प्रकरणात अडकले होते. त्यामुळे संघाला बंदीचा सामना करावा लागला.
चेन्नईने नंतर २०१८ मध्ये पुन्हा आयपीएलमध्ये पुनरागमन केले. २०१८ पासून चेन्नईने तीनदा आयपीएलही जिंकली.