Pranali Kodre
सचिन तेंडुलकरची लेक सारा ही विविध कारणाने चर्चेचा विषय ठरत असते.
तिने काही दिवसांपूर्वीच ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीग (GEPL) च्या दुसऱ्या हंगामासाठी मुंबई फ्रँचायझीची मालक झाली आहे.
सारा सचिन तेंडुलकर फाऊंडेशनची डायरेक्टर देखील आहे.
दरम्यान, सारा नुकतीच काही दिवसापूर्वीच ऑस्ट्रेलियामध्ये होती. तिने नुकतेच सिडनीमधील तिचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
ती यात फिकट पिवळ्या रंगाचा वनपीस घातलेला दिसत आहे आणि ती बोटीतून फिरताना दिसत आहे.
साराने तिच्या या पोस्टला सारा तेंडुलकर की कश्ती में, असे कॅप्शन दिले आहे.
साराने वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण पूर्ण केले आहे. तिने काही ब्युटी ब्रँड्ससाठीही जाहिराती केल्या आहेत.