Pranali Kodre
आयपीएल २०२६ स्पर्धेचा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स संघात ३१ मे रोजी खेळवला जाणार आहे.
RCB vs GT
Sakal
बंगळुरूने गुजरातला क्वालिफायर १ सामन्यात पराभूत करत अंतिम सामना गाठला होता, तर गुजरातने क्वालिफायर २ सामन्यात राजस्थानला पराभूत करत अंतिम सामना गाठला.
RCB vs GT
Sakal
दरम्यान, आता आयपीएलचा गेल्या ८ वर्षांचा इतिहास पाहिला, तर बंगळुरू संघ आयपीएल २०२६ स्पर्धा जिंकू शकतात.
RCB
Sakal
कारण गेल्या ८ वर्षात असं प्रत्येकवेळी झालं आहे की क्वालिफायर १ सामना जिंकणारा संघ आयपीएल ट्रॉफी जिंकला आहे.
RCB
Sakal
२०१८, २०२१ आणि २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्सने क्वालिफायर १ सामना जिंकल्यानंतर आयपीएल ट्रॉफी जिंकली होती.
CSK 2023
Sakal
२०१९ आणि २०२० मध्ये मुंबई इंडियन्सने क्वालिफायर १ सामना जिंकल्यानंतर आयपीएल ट्रॉफी जिंकली होती.
MI 2020
Sakal
२०२२ मध्ये गुजरात टायटन्सने, २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने आणि २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने क्वालिफायर १ सामना जिंकल्यानंतर आयपीएल ट्रॉफी जिंकली होती.
KKR, RCB, GT
Sakal
त्यामुळे आता बंगळुरूचा प्रयत्न हा इतिहास कायम करण्याचा असेल, तर गुजरात हा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करेल.
RCB vs GT
Sakal
Vaibhav Sooryavanshi 500 runs in IPL 2026 Power Play
Sakal