kimaya narayan
आज 16 जानेवारीला मध्यरात्री अभिनेता सैफ अली खानवर चोराने चाकूने हल्ला केला. मोलकरणीला वाचवण्याच्या नादात सैफ गंभीर जखमी झाला. त्यामुळे पुन्हा एकदा सैफच्या घरातील स्टाफ चर्चेत आला आहे.
पण सैफच्या घरचा स्टाफ, त्याच्या मुलांना सांभाळणाऱ्या नॅनी कायमच चर्चेत असतात. त्यावरूनच त्यांना किती पगार असावा याची चर्चा पुन्हा सुरु झालीये.
मध्यंतरी तैमूर आणि जेह यांना सांभाळणाऱ्या नॅनीला 2.5 लाख रुपये पगार महिन्याला मिळतो अशी चर्चा होती. नॅनीचा एवढा पगार पाहून सगळेचजण चकित झाले होते.
पण तैमूर आणि जेह या दोघांनाही सांभाळणारी सिस्टर ललिता डिसिल्व्हा यांनी पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत त्यांचा पगार इतका नसल्याचं स्पष्ट केलं.
"२.५ लाख ! कदाचित असं झालं असतं तर. तुमचे हे शब्द खरे होवोत. पण असं काही नाहीये." अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
हा किस्सा ललिता यांनी करिनाला सांगितल्यावर ती म्हणाली होती कि,"'हे सगळे विनोद आहेत. इतकं गांभीर्याने घेऊ नकोस."