Aarti Badade
या मंत्राच्या नित्य पठणाने मनातील सर्व प्रकारची भीती, चिंता आणि नकारात्मकता दूर होऊन मानसिक शांती लाभते.
Shri Swami Samarth Tarak Mantra
Sakal
निःशंक होई रे मना, निर्भय होई रे मना।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना।
अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।१।।
Shri Swami Samarth Tarak Mantra
sakal
जिथे स्वामीचरण तिथे न्यून्य काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।
अगम्य लीला त्यांची ती स्वामी जाणे,
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।२।।
Shri Swami Samarth Tarak Mantra
Sakal
आज्ञेविण काळ ना नेई त्याला,
परलोकीही ना भीती तयाला।
उगाची भितोसी भय हे पळू दे,
वसे अंतरी ही स्वामीशक्ती कळू दे।।
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।३।।
Shri Swami Samarth Tarak Mantra
Sakal
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा।
खरा होई जागा श्रद्धेसहित,
कसा होशी त्याविण तू स्वामिभक्त।।
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।४।।
Shri Swami Samarth Tarak Mantra
Sakal
विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ,
स्वामीच ह्या पंचप्राणामृतात।
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती,
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती।।
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।५।।
|| श्री स्वामी चरणार्पणमस्तु ||
Shri Swami Samarth Tarak Mantra
Sakal
'अशक्य ही शक्य करतील स्वामी' या एकाच ओळीतील दृढ विश्वासामुळे भक्ताचा आत्मविश्वास कमालीचा वाढतो.
Shri Swami Samarth Tarak Mantra
Sakal
स्वामींचे अभय कवच राहते असा सर्व भक्तांचा अढळ विश्वास आहे.. मंत्रातील चैतन्यमयी शब्दांमुळे संकटाच्या वेळीही मनाला स्थिरता मिळते आणि स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येते.
Shri Swami Samarth Tarak Mantra
Sakal
World Longest River Nile Facts
Sakal