कडक गरम चहा-कॉफी पिण्याआधी हे नक्की वाचा!

Aarti Badade

चहा-कॉफी खूप गरम पिता?

चहा किंवा कॉफी अतिउष्ण अवस्थेत पिण्याची सवय असेल, तर अन्ननलिकेच्या आरोग्याबाबत सावध राहणे गरजेचे आहे.

Very Hot Tea and Coffee

|

Sakal

संशोधनात काय समोर आलं?

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सुमारे १० लाख मध्यमवयीन महिला-पुरुषांचा १४ वर्षे अभ्यास करून अतिउष्ण पेयांबाबत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले.

Very Hot Tea and Coffee

|

Sakal

६५°C पेक्षा जास्त तापमान धोकादायक?

इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरनुसार ६५°C किंवा त्याहून अधिक तापमानाची पेये ‘अतिउष्ण’ मानली जातात.

Very Hot Tea and Coffee

|

Sakal

कॅन्सरच्या धोक्याशी संबंध

अभ्यासानुसार कोमट पेयांच्या तुलनेत अतिउष्ण पेये घेणाऱ्यांमध्ये अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका अधिक आढळला.

Very Hot Tea and Coffee

|

Sakal

दिवसातून अनेकदा गरम पेये?

दिवसातून सहा किंवा त्याहून अधिक वेळा अतिउष्ण पेये घेणाऱ्यांमध्ये हा संबंध अधिक स्पष्ट दिसून आला.

Very Hot Tea and Coffee

|

Sakal

दूध घातल्याने तापमान लगेच कमी होत नाही

चहा किंवा कॉफीमध्ये दूध मिसळले तरी पेय पुरेसे थंड होईलच असे नाही, त्यामुळे पिण्यापूर्वी ते थोडे निवू द्या.

Very Hot Tea and Coffee

|

Sakal

तज्ज्ञांचा साधा सल्ला

जिभेला किंवा घशाला चटका बसणार नाही इतके गरम, म्हणजे कोमट किंवा मध्यम गरम पेय घेणे अधिक सुरक्षित पर्याय ठरू शकतो.

Very Hot Tea and Coffee

|

Sakal

इतर जोखमीही लक्षात ठेवा

अन्ननलिकेच्या कर्करोगासाठी धूम्रपान, मद्यपान आणि लठ्ठपणा हेही महत्त्वाचे जोखमीचे घटक असून त्यापासून दूर राहणे गरजेचे आहे.

Very Hot Tea and Coffee

|

Sakal

गूळ-खोबरे एकत्र खाता? आधी 'हे' वाचा!

Jaggery and Coconut Together

|

Sakal

येथे क्लिक करा