गिझर ऑन ठेवून आंघोळ करण्याआधी 'हे' वाचा!

Aarti Badade

गिझर ऑन ठेवून आंघोळ करता?

पावसाळा असो वा हिवाळा, गरम पाण्यासाठी गिझरचा वापर होतो. पण आंघोळ करताना गिझर सुरू ठेवणे धोकादायक ठरू शकते.

geyser bathroom safety

|

Sakal

गिझरमधून करंट लीक होऊ शकतो!

गिझरमधील हीटिंग कॉइल खराब किंवा गंजलेली असल्यास वीज पाण्यात उतरू शकते. अशावेळी शॉवरमधून करंट लागण्याचा धोका असतो.

geyser bathroom safety

|

Sakal

ओल्या बाथरूममध्ये धोका अधिक

आंघोळीच्या वेळी शरीर आणि फरशी ओले असतात. त्यामुळे वीज गळती झाल्यास विजेचा धक्का गंभीर ठरू शकतो.

geyser bathroom safety

|

Sakal

गिझरचा स्फोटही होऊ शकतो?

गिझरचा थर्मोस्टॅट किंवा ऑटो-कट खराब असल्यास पाणी अतितापू शकते. त्यामुळे आतील दाब वाढून गिझरचे नुकसान होण्याचा धोका असतो.

geyser bathroom safety

|

Sakal

आंघोळीपूर्वी हे नक्की करा

आधी गिझर सुरू करून पाणी गरम करून घ्या. आंघोळीला जाण्यापूर्वी गिझरचा मुख्य स्विच बंद करा.

geyser bathroom safety

|

Sakal

अर्थिंगची तपासणी करा

घरातील गिझरसाठी योग्य अर्थिंग आहे की नाही, हे इलेक्ट्रिशियनकडून तपासून घ्या. यामुळे वीज गळतीचा धोका कमी करण्यास मदत होते.

geyser bathroom safety

|

Sakal

RCCB किंवा ELCB बसवा

बाथरूमच्या सुरक्षेसाठी RCCB/ELCB बसवणे महत्त्वाचे आहे. करंट लीक झाल्यास हे उपकरण वीजपुरवठा आपोआप बंद करण्यास मदत करते.

geyser bathroom safety

|

Sakal

सुरक्षित राहा, काळजी घ्या!

गिझर सुरू ठेवून आंघोळ करण्याची सवय टाळा. गिझर, वायरिंग, अर्थिंग आणि सेफ्टी डिव्हाइसची वेळोवेळी तपासणी करून घ्या.

geyser bathroom safety

|

Sakal

शेंगदाणे की जवस? आरोग्यासाठी काय आहे बेस्ट?

Peanuts or Flaxseeds

|

Sakal

येथे क्लिक करा