ऑफिसच्या बिझी शेड्युलमध्येही पुस्तकांसोबत मैत्री कशी टिकवायची?

Monika Shinde

9 ते 5 नोकरीत

आजच्या धावपळीच्या जीवनात 9 ते 5 नोकरी करणाऱ्या अनेकांना “वाचायला वेळच मिळत नाही” असे वाटते. ऑफिसची कामे, प्रवास, घरची जबाबदारी यामध्ये पुस्तक वाचन मागे पडते.

reading habits for busy professionals

थोडेसे नियोजन

मात्र, थोडेसे नियोजन आणि योग्य सवयी लावल्यास रोजच्या व्यस्त वेळापत्रकातही वाचन सहज शक्य होते.

reading habits for busy professionals

लहान वेळेचे उद्दिष्ट ठेवा

दररोज मोठे अध्याय पूर्ण करण्याचा ताण घेण्याऐवजी, 10 ते 20 मिनिटे वाचनासाठी राखून ठेवा. दररोज थोडेथोडे वाचल्यास आठवड्याअखेर बरीच पाने वाचून होतात.

reading habits for busy professionals

प्रवासाचा सकारात्मक वापर करा

ऑफिसला जाताना किंवा येतानाची वेळ वाचनासाठी उत्तम असतो. बस, ट्रेन किंवा मेट्रोमध्ये पुस्तक, ई-बुक किंवा ऑडिओबुकचा वापर करू शकता.

reading habits for busy professionals

झोपण्यापूर्वी वाचनाची सवय लावा

मोबाइल किंवा टीव्ही पाहण्याऐवजी झोपण्यापूर्वी काही पाने वाचा. यामुळे मन शांत होते आणि झोपही चांगली लागते.

reading habits for busy professionals

वाचनामागचे उद्दिष्ट ठरवा

तुम्ही वाचन का करता हे स्वतःला स्पष्ट ठेवा ज्ञान वाढवण्यासाठी, ताण कमी करण्यासाठी किंवा प्रेरणा मिळवण्यासाठी. उद्दिष्ट स्पष्ट असेल तर वाचनाची सवय टिकून राहते.

reading habits for busy professionals

पुस्तकाची ओळख आधी करून घ्या

संपूर्ण पुस्तक लगेच सुरू करण्याऐवजी प्रस्तावना, आशय सूची आणि मागील पान वाचा. यामुळे पुस्तकाचा गाभा समजतो आणि वाचायची उत्सुकता वाढते.

reading habits for busy professionals

आवडीच्या विषयांपासून सुरुवात करा

ज्या विषयात तुम्हाला रस आहे तेच पुस्तक निवडा. आवड असलेल्या विषयाचे वाचन कंटाळवाणे वाटत नाही आणि नियमितता राखली जाते.

reading habits for busy professionals

कंटाळा आला तर पुस्तक बदला

एखादे पुस्तक आवडत नसेल किंवा जड वाटत असेल तर ते जबरदस्तीने पूर्ण करू नका. दुसरे पुस्तक निवडणेही योग्यच आहे.

reading habits for busy professionals

|

Esakal

वाचनासाठी योग्य जागा निवडा

शांत, प्रकाशयुक्त आणि आरामदायी जागा वाचनासाठी निवडा. योग्य वातावरण असल्यास लक्ष केंद्रित करणे सोपे जाते.

reading habits for busy professionals

|

Esakal

Dhurandhar Sara Arjun: ‘धुरंधर’मुळे चर्चेत आलेली सारा अर्जुन कोण आहे?

येथे क्लिक करा