Monika Shinde
‘धुरंधर’ चित्रपटामुळे अभिनेत्री सारा अर्जुन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बालकलाकार ते प्रमुख भूमिका असा तिचा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे.
लहान वयातच जाहिराती आणि चित्रपटांतून सारा अर्जुनने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिच्या नैसर्गिक अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.
१८ जून २००५ रोजी जन्मलेल्या सारा अर्जुनचे वय सध्या २० वर्षे आहे. कमी वयातच तिने मोठी ओळख निर्माण केली आहे.
साराने मुंबईतून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. अभिनयासोबत शिक्षण सुरू ठेवण्यावर तिने नेहमीच भर दिला आहे.
हिंदी, तमिळ आणि इतर भाषांतील चित्रपटांत बालकलाकार म्हणून काम करत तिने बहुभाषिक प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता मिळवली.
अनेक मोठ्या ब्रँडच्या जाहिरातींमध्ये झळकलेली सारा अर्जुन ही दिग्दर्शकांचीही पहिली पसंती ठरली आहे.
‘धुरंधर’मधील तिची भूमिका प्रेक्षक आणि समीक्षकांकडून विशेष प्रशंसित होत असून तिच्या अभिनयाचे नवे रूप दिसते.