17 व्या शतकात बांधलेल्या मुरुड-जंजिरा किल्ल्याचं खरं नाव काय? जाणून घ्या इतिहास

Aarti Badade

मुरुड-जंजिरा

रायगड जिल्ह्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्याजवळ १७ व्या शतकात बांधलेला हा जलदुर्ग आजही लाटांशी झुंज देत दिमाखात उभा आहे.

Murud Janjira History

|

Sakal

किल्ल्याचे खरे नाव काय?

आपण याला मुरुड-जंजिरा म्हणून ओळखतो, पण इतिहासानुसार या किल्ल्याचे खरे नाव 'जजीरे मेहरुब' असे आहे.

Murud Janjira History

|

Sakal

'जजीरे' शब्दाचा अर्थ

अरबी भाषेत 'जजीरे' या शब्दाचा अर्थ होतो पाण्याने वेढलेले बेट. हा किल्ला चारही बाजूंनी समुद्राने वेढलेला असल्याने त्याला जंजिरा म्हटले जाते.

Murud Janjira History

|

sakal

'मेहरुब' म्हणजे काय?

मेहरुब या शब्दाचा अर्थ चंद्रकोर असा होतो. किल्ल्याचा आकार आणि त्याची रचना लक्षात घेऊन हे नाव देण्यात आले असावे

Murud Janjira History

|

Sakal

अभेद्य आणि अजिंक्य किल्ला

मुरुड-जंजिरा हा भारतातील अशा दुर्मिळ किल्ल्यांपैकी एक आहे, जो अनेक आक्रमणे होऊनही कधीही कोणाला जिंकता आला नाही.

Murud Janjira History

|

Sakal

गोड्या पाण्याचे आश्चर्य

हा किल्ला समुद्राच्या खाऱ्या पाण्यात असूनही, किल्ल्याच्या आत पिण्याच्या पाण्याचे दोन मोठे तलाव आहेत, जे आजही पर्यटकांना थक्क करतात.

Murud Janjira History

|

Sakal

ऐतिहासिक पार्श्वभूमी

सिद्दी राजवटीचा हा किल्ला मराठा साम्राज्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा होता. शिवछत्रपतींपासून ते संभाजी महाराजांपर्यंत सर्वांनी हा किल्ला जिंकण्याचे प्रयत्न केले होते.

Murud Janjira History

|

Sakal

पर्यटनासाठी सर्वोत्तम ठिकाण

इतिहास, वास्तुकला आणि अथांग समुद्र पाहायचा असेल, तर जंजिरा किल्ल्याला नक्की भेट द्या. किल्ल्याचा मुख्य दरवाजा जवळ गेल्याशिवाय दिसत नाही, हे याचं मोठं वैशिष्ट्य आहे.

Murud Janjira History

|

Sakal

गर्दीपासून दूर, निसर्गाच्या कुशीतली मुंबईजवळच्या 'या' ठिकाणांना नक्की द्या भेट!

places near Mumbai Panvel tourism

|

Sakal

येथे क्लिक करा