Saisimran Ghashi
शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथे झाला.
त्यांचे पूर्ण नाव श्रीमंत छत्रपती शाहूजी महाराज होते. ते कोल्हापूर संस्थानाचे अधिपती होते.
आज शाहू महाराजांची जयंती आहे
शाहू महाराजांनी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू केले. त्यांनी मागासवर्गीय व मुलींसाठीही शाळा सुरू केल्या.
त्यांनी 1902 मध्ये मागासवर्गीयांसाठी सरकारी नोकर्यांमध्ये 50% आरक्षण जाहीर केले.
शाहू महाराज महात्मा फुले यांचे विचार मानणारे होते. त्यांनी सत्यशोधक समाजाला मदत केली व त्याच्या विचारांचा प्रसार केला.
शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये अनेक शिक्षण संस्था, वसतीगृहे आणि ग्रंथालये स्थापन केली.
शाहू महाराजांचे निधन 6 मे 1922 रोजी झाले. आजही त्यांची ओळख ‘राजर्षि’ म्हणून केली जाते म्हणजेच राजाही आणि ऋषीही!