रिअलमीचा स्वस्तात मस्त 5G स्मार्टफोन लाँच; टॉप मॉडेलची किंमत केवळ 15 हजार

Sudesh

रिअलमी

रिअलमीने आपला नवा Realme 12x 5G हा स्मार्टफोन आज भारतात लाँच केला.

Realme 12x 5G | eSakal

Realme 12

रिअलमीच्या 12 सीरीजमधील हा आणखी एक व्हेरियंट आहे. हा एक 'एंट्री लेव्हल 5G किलर' स्मार्टफोन असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

Realme 12x 5G | eSakal

किंमत

या फोनचे तीन व्हेरियंट लाँच करण्यात आले आहेत. 4GB+128GB व्हेरियंटची किंमत 11,999 रुपये आहे. 6GB+128GB व्हेरियंटची किंमत 13,499 रुपये आहे.

Realme 12x 5G | eSakal

टॉप व्हेरियंट

या फोनच्या टॉप व्हेरियंटमध्ये 8GB रॅम आणि 128GB मेमरी देण्यात येते. याची किंमत 14,999 रुपये एवढी आहे.

Realme 12x 5G | eSakal

ऑफर्स

2 एप्रिल रोजी सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत या फोनवर खास डिस्काउंट मिळणार आहे. यामध्ये प्रत्येक व्हेरियंटवर 1,000 रुपये सूट मिळेल. यासोबतच 1,500 रुपयांपर्यंत कार्ड डिस्काउंटही उपलब्ध आहे.

Realme 12x 5G | eSakal

फीचर्स

या फोनमध्ये 6.72 इंच FHD+ IPS LCD डिस्प्ले दिला आहे. तसंच यामध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6100+ SOC प्रोसेसर दिला आहे. विशेष म्हणजे यात ऑडिओ जॅकही दिला आहे.

Realme 12x 5G | eSakal

कॅमेरा

या फोनमध्ये 50MP+2MP असा ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. तसंच सेल्फीसाठी यात 8MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.

Realme 12x 5G | eSakal

बॅटरी

या फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W चार्जिंगला सपोर्ट करते. सोबतच या फोनला IP54 रेटिंग मिळाली आहे.

Realme 12x 5G | eSakal

रिअलमीने लाँच केले दोन नवे स्मार्टफोन; पाहा किंमत अन् फीचर्स

Realme 12 Plus 5G | eSakal