चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतायत? जाणून घ्या त्यामागील 'ही' मुख्य कारणे!

Aarti Badade

मासिक पाळी आणि हॉरमोनल बदल

महिलांमध्ये मासिक पाळी दरम्यान (Periods) शरीरातील 'अँड्रोजन' हार्मोन्समध्ये अचानक वाढ होते. या हार्मोनल बदलांमुळे चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येण्याची समस्या उद्भवते.

Reasons for pimples on face

|

Sakal

तेलकट त्वचा

जर तुमची त्वचा ऑइली असेल, तर चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचा धोका जास्त असतो. त्वचेवरील अतिरिक्त तेलामुळे छिद्रे (Pores) बंद होतात आणि त्यात बॅक्टेरिया वाढून पिंपल्स येतात.

Reasons for pimples on face

|

Sakal

मानसिक ताण आणि झोपेचा अभाव

अतिविचार, तणाव (Stress) किंवा रात्रीची झोप पूर्ण न झाल्यामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. यामुळे देखील चेहऱ्याचे आरोग्य बिघडून पिंपल्स वाढतात.

Reasons for pimples on face

|

Sakal

अतिप्रमाणात मेकअपचा वापर

चेहऱ्यावर जास्त प्रमाणात हेवी क्रीम्स किंवा तेलकट (Oil-based) मेकअप उत्पादने वापरल्याने त्वचेला ऑक्सिजन मिळत नाही. ही उत्पादने छिद्रे बंद करतात, ज्यामुळे पिंपल्स येतात.

Reasons for pimples on face

|

Sakal

जंक फूड आणि गोड पदार्थांचे सेवन

अति प्रमाणात तेलकट जंक फूड, प्रक्रियेत केलेले अन्न आणि गोड पदार्थ (साखरयुक्त पदार्थ) खाल्ल्याने शरीरातील उष्णता आणि इन्सुलिन वाढते, ज्याचा थेट परिणाम पिंपल्सच्या रूपात दिसतो.

Reasons for pimples on face

|

Sakal

पोटाच्या समस्या आणि अपचन

तुमचे पोट साफ नसेल, तर त्याचा परिणाम चेहऱ्यावर नक्कीच दिसतो. बद्धकोष्ठता , अपचन आणि पोटाच्या इतर तक्रारींमुळे चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येऊ लागतात.

Reasons for pimples on face

|

Sakal

औषधांचे दुष्परिणाम

काही विशिष्ट आजारांवर दीर्घकाळ घेतली जाणारी औषधे किंवा स्टेरॉईड्सच्या साईड इफेक्ट्समुळे देखील शरीरात उष्णता वाढते आणि चेहऱ्यावर अचानक पिंपल्स येणे सुरू होऊ शकते.

Reasons for pimples on face

|

Sakal

मधुमेह असूनही तूप खाताय? डॉक्टरांचे मत जाणून घ्या!

ghee good for diabetes

|

Sakal

येथे क्लिक करा