बाळकृष्ण मधाळे
केळ हे आपल्या दैनंदिन आहारातील अत्यंत पौष्टिक आणि सहज उपलब्ध फळ मानले जाते. सामान्य पिवळ्या केळ्यांप्रमाणेच लाल केळीही आरोग्यासाठी अतिशय लाभदायक मानली जातात.
Red Banana Benefits
esakal
लाल केळी दिसायला आकर्षक असून त्यांची साल लालसर रंगाची असते. ही केळी अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असतात.
Red Banana Benefits
esakal
Healthline च्या माहितीनुसार, सुमारे १०० ग्रॅम वजनाच्या एका लहान लाल केळामधून शरीराला व्हिटॅमिन B6 च्या दैनंदिन गरजेपैकी जवळपास २८ टक्के आणि व्हिटॅमिन C चे सुमारे ९ टक्के प्रमाण मिळते.
Red Banana Benefits
esakal
लाल केळामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही उपयुक्त ठरते. तसेच, मॅग्नेशियममुळे स्नायू आणि हाडे मजबूत राहण्यास मदत मिळते.
Red Banana Benefits
esakal
या केळांमध्ये ‘ल्युटीन’ नावाचा घटक आढळतो, जो डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. त्याचबरोबर लाल केळांमध्ये फायबर आणि प्रथिनांचेही चांगले प्रमाण असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
Red Banana Benefits
esakal
भारतामध्ये लाल केळी मुख्यतः कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. याशिवाय ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि अमेरिकेतही त्यांची लागवड केली जाते.
Red Banana Benefits
esakal
बाजारात सहज मिळणाऱ्या पिवळ्या केळ्यांमध्येही पोटॅशियम, फायबर, प्रथिने आणि इतर आवश्यक पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे लाल असो वा पिवळे केळ हे आरोग्यासाठी लाभदायकच मानले जाते.
Red Banana Benefits
esakal
Spotted Bananas Benefits
esakal