लाल विटा आणि काँक्रीट ब्लॉकमध्ये काय फरक असतो?

Varsha Balhe

फरक

घर बांधताना लाल विटा आणि काँक्रीट ब्लॉक हे दोन्ही पर्याय वापरले जातात. पण हे दोन्ही दिसायला आणि वापरायला वेगळे असतात. चला, त्यांच्यातला फरक जाणून घेऊया.

RED BRICKS VS CONCRETE BLOCKS

|

esakal

लाल विटा

लाल विटा चिकणमातीपासून तयार केल्या जातात. त्यांना भट्टीत भाजून तयार केलं जातं, त्यामुळे त्यांना लालसर रंग येतो.

RED BRICKS VS CONCRETE BLOCKS

|

esakal

काँक्रीट ब्लॉक

काँक्रीट ब्लॉक सिमेंट, वाळू आणि खडी यांसारख्या साहित्यापासून तयार केले जातात. हे ब्लॉक लाल विटांच्या तुलनेत आकाराने मोठे असतात.

RED BRICKS VS CONCRETE BLOCKS

|

esakal

आकार

लाल विटा आकाराने लहान असतात, त्यामुळे भिंत बांधताना जास्त विटा लागतात. काँक्रीट ब्लॉक मोठे असल्यामुळे कमी ब्लॉकमध्ये भिंतीचं बांधकाम करता येतं.

RED BRICKS VS CONCRETE BLOCKS

|

esakal

RED BRICKS VS CONCRETE BLOCKSमजबूत

लाल विटा आणि काँक्रीट ब्लॉक या दोन्हींची मजबुती त्यांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. योग्य दर्जाचे काँक्रीट ब्लॉक जास्त भार सहन करू शकतात; मात्र प्रत्येक ब्लॉक लाल विटेपेक्षा मजबूत असेलच असं नाही.

RED BRICKS VS CONCRETE BLOCKS

|

esakal

पाणी

लाल विटा आणि काँक्रीट ब्लॉक दोन्ही पाणी शोषू शकतात. हे प्रमाण त्यांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतं. त्यामुळे भिंतींना ओलावा येऊ नये यासाठी योग्य बांधकाम आणि वॉटरप्रूफिंग महत्त्वाचं असतं.

RED BRICKS VS CONCRETE BLOCKS

|

esakal

बांधकामाचा खर्च कशात कमी येतो?

काँक्रीट ब्लॉक आकाराने मोठे असल्यामुळे बांधकाम लवकर होऊ शकतं. काही वेळा त्यात सिमेंट-वाळूचं मिश्रण आणि मजुरीचा खर्चही कमी होतो. मात्र एकूण खर्च हा साहित्याचे दर आणि बांधकामाच्या पद्धतीवर अवलंबून असतो.

RED BRICKS VS CONCRETE BLOCKS

|

esakal

मग घरासाठी कोणता पर्याय चांगला?

लाल विटा आणि काँक्रीट ब्लॉक या दोन्हींचा वापर घर बांधण्यासाठी करता येतो. योग्य पर्याय निवडताना साहित्याचा दर्जा, खर्च आणि घराच्या बांधकामाचा आराखडा लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.

RED BRICKS VS CONCRETE BLOCKS

|

esakal

कावळा आणि कोकिळा यात काय फरक असतो?

CROW VS CUCKOO DIFFERENCES

|

esakal

येथे क्लिक करा