Shubham Banubakode
रेड कार्पेट आज सेलिब्रिटी किंवा खास व्यक्तींच्या स्वागतासाठी वापरला जातं. ते सन्मान आणि वैभवाचं प्रतिक आहे. त्यामुळे कोणताही कार्यक्रम खास बनतो.
रेड कार्पेटचा इतिहास इ.स. पूर्व 458 पासून सुरू होतो. ग्रीक नाटक “एगामेम्नॉन” मध्ये राजा एगामेम्नॉनसाठी रेड कार्पेट टाकण्यात आलं होतं. त्यावेळी ते शाही सन्मानाचं मानल्या गेलं.
लाल रंग शक्ती, साहस आणि समृद्धीचे प्रतीक समजला जातो. प्राचीन काळी लाल रंगाची डाई अत्यंत महागडी होती, त्यामुळे लाल रंग शाही सन्मानासाठी निवडला गेला.
मध्ययुगात युरोपामध्ये राजघराण्यातील लोक लाल कालीनावरून चालत असत. चर्च आणि शाही समारंभात विशेष पाहुण्यांसाठी रेड कार्पेट टाकले जाई.
1922 मध्ये हॉलीवुडच्या सिदमन्स थिएटरमध्ये प्रथमच सेलिब्रिटीजसाठी रेड कार्पेट टाकण्यात आलं. यामुळे रेड कार्पेट ग्लॅमर आणि प्रसिद्धीचे प्रतीक बनले.
1961 मध्ये ऑस्कर पुरस्कार समारंभाने रेड कार्पेटचा वापर करण्यात आला. त्यामुळे ही प्रथा जगभरात पोहोचली.
भारतात रेड कार्पेट चित्रपटांचे प्रीमियर, पुरस्कार सोहळे आणि सरकारी समारंभात टाकले जातात. त्याद्वारे खास पाहुण्यांना विशेष सन्मान दिला जातो.