सकाळ डिजिटल टीम
लाल किल्ला आधी पूर्ण पांढरा होता का? त्याच्या रंगामागे दडलेला इतिहास जाणून घ्या.
Red Fort History
मुघल सम्राट शाहजहानने १६३९ मध्ये दिल्लीतील लाल किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात केली.
Red Fort History
सुमारे नऊ वर्षांच्या बांधकामानंतर १६४८ मध्ये हा भव्य किल्ला तयार झाला.
Red Fort History
किल्ल्याची बाहेरील तटबंदी लाल वाळूच्या दगडाची होती. तर आतील महालांमध्ये संगमरवर आणि चुन्याचा गिलावा वापरला होता.
Red Fort History
किल्ल्यातील काही इमारतींवर संगमरवराची भुकटी मिसळलेला पांढरा चुन्याचा गिलावा लावण्यात आला होता.
Red Fort History
१८५७ च्या उठावानंतर ब्रिटिशांनी किल्ल्यातील अनेक इमारतींचे स्वरूप बदलले. काही इमारतींवर लाल रंग लावण्यात आला.
Red Fort History
२०११ मध्ये पुरातत्त्व विभागाने नौबतखान्याच्या एका भागावरील लाल थर काढून मूळ पांढऱ्या गिलाव्याचे स्वरूप दाखवले.
Red Fort History
लाल किल्ल्याचे मूळ नाव किला-ए-मुबारक होते. लाल दगडांच्या भव्य तटबंदीमुळे पुढे त्याला लाल किल्ला म्हटले जाऊ लागले.
Red Fort History
Fly Ash Bricks vs Red Bricks