लाल पेरू खाण्याचे 'हे' जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहे का ?

सकाळ डिजिटल टीम

लाल पेरू

रोज लाल पेरू खाल्यास आरोग्यास कोणते फायदे मिळतात जाणून घ्या.

Red Guava Benefits

|

sakal

व्हिटॅमिन सी

लाल पेरूमध्ये लिंबूवर्गीय फळांपेक्षा चारपट अधिक व्हिटॅमिन सी असते, जे रोगप्रतिकारशक्ती त्वरित वाढवते आणि संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करते.

Red Guava Benefits

|

sakal 

हृदयविकार

यामध्ये पोटॅशियम आणि विरघळणारे फायबर असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि शरीरातील खराब कोलेस्टेरॉल (LDL) कमी करण्यास मदत करते.

Red Guava Benefits

|

sakal 

मधुमेह

पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी असतो. तसेच, फायबरचे प्रमाण जास्त असल्याने रक्तातील साखर (Blood Sugar) अचानक वाढत नाही, ज्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

Red Guava Benefits

|

sakal 

बद्धकोष्ठता

पेरूच्या बियांमध्ये असलेले उच्च फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवते. हे बद्धकोष्ठता (Constipation) दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते.

Red Guava Benefits

|

sakal 

तणाव

पेरूमध्ये मॅग्नेशियम (Magnesium) असते, जे स्नायूंना आराम देते आणि मज्जातंतूंना शांत करते. यामुळे दिवसभरातील तणाव (Stress) कमी होऊन चांगली झोप लागते.

Red Guava Benefits

|

sakal 

कोलेजन

व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्समुळे पेरू त्वचेतील कोलेजन उत्पादन वाढवतो. यामुळे त्वचा तरुण, चमकदार आणि सुरकुत्यामुक्त (Anti-Aging) राहते.

Red Guava Benefits

|

sakal 

व्हिटॅमिन ए

पेरूमध्ये व्हिटॅमिन ए (Vitamin A) आढळते. जरी ते गाजराएवढे नसले तरी, दृष्टी सुधारण्यासाठी आणि डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी ते महत्त्वाचे ठरु शकते.

Red Guava Benefits

|

sakal 

गर्भधारणेत उपयुक्त

पेरूमध्ये फॉलिक ॲसिड (Folic Acid) किंवा व्हिटॅमिन B9 असते. हे गर्भधारणेदरम्यान बाळाच्या मज्जासंस्थेच्या योग्य विकासासाठी आवश्यक असते.

Red Guava Benefits

|

sakal 

दररोज ब्रेड-ऑम्लेट खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो?

येथे क्लिक करा