आयुर्वेदानुसार लाल मुळा कोणी खावा अन् कोणी टाळावा?

Aarti Badade

लाल मुळा: पौष्टिक आणि फायदेशीर

लाल मुळा (Red Radish) हा जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरने भरपूर असतो. सामान्यतः, तो जेवणासोबत किंवा हिवाळ्यात खाणे खूप फायदेशीर मानले जाते.

Sakal

मुळा कोणी खावा?

पौष्टिकतेमुळे सर्वजण मुळा खाऊ शकतात. मुळा उष्ण गुणधर्माचा असल्याने हिवाळ्यात खाणे उत्तम. यात कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असल्याने वजन कमी करण्यासाठी चांगला. जेवणानंतर खाल्ल्यास पचन सुधारते.

Sakal

कोणी खाऊ नये किंवा काळजी घ्यावी?

आयुर्वेदानुसार, काही लोकांनी मुळा खाणे टाळावे किंवा काळजी घ्यावी, पोटाच्या समस्या असणारे लोक. ज्यांना छातीत जळजळ (Heartburn) किंवा रक्तदाबाचा त्रास आहे.

Sakal

रिकाम्या पोटी आणि दूधासोबत टाळा!

रिकाम्या पोटी मुळा खाल्ल्यास छातीत आणि पोटात जळजळ होऊ शकते. मुळा आणि दूध एकत्र सेवन करणे पचनासाठी घातक ठरू शकते, म्हणून टाळा.

Sakal

इतर कोण काळजी घेतील?

आतड्यांसंबंधी समस्या असणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींनी मुळ्यातील नैसर्गिक तीक्ष्ण गुणधर्मामुळे जपून सेवन करावे.

sakal

मुळा कसा खावा?

सॅलडमध्ये किंवा स्नॅक म्हणून पौष्टिक आणि चविष्ट पर्याय, मुळ्याचे गरमागरम पराठे.

Sakal

तिखट चव कमी करण्याची टीप

मुळ्याची तिखट चव कमी करायची असल्यास, तुम्ही तो शिजवून खाऊ शकता. तो भाजून, बेक करून किंवा परतून खाणे देखील आरोग्यदायी आहे.

Sakal

फळांबरोबर भिजलेलं अक्रोड खाल्याने कोणते फायदे होतात?

येथे क्लिक करा