Varsha Balhe
अनाथ झालेल्या पिल्लांची काळजी घेणं फक्त माणसांमध्येच पाहायला मिळतं असं नाही. एका प्राण्याची ही सवय तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करेल.
THIS ANIMAL ADOPTS ORPHANED BABIES
esakal
आई गमावलेल्या पिल्लाला हा प्राणी आपल्या पिल्लांमध्ये सामावून घेतो. त्याची स्वतःच्या पिल्लाप्रमाणे काळजी घेतली जाते.
THIS ANIMAL ADOPTS ORPHANED BABIES
esakal
मात्र, समोर दिसेल त्या अनाथ पिल्लाला दत्तक घेतलं जात नाही. त्यामागे एक खास कारण आहे.
THIS ANIMAL ADOPTS ORPHANED BABIES
esakal
ज्या पिल्लाशी जवळचं नातं असेल, त्यालाच दत्तक घेण्याची शक्यता जास्त असते. म्हणजेच हा प्राणी आपल्या नातेवाईकांना ओळखतो.
THIS ANIMAL ADOPTS ORPHANED BABIES
esakal
हा अनोखा गुण लाल खारींमध्ये पाहायला मिळतो. त्या जवळच्या नात्यातील अनाथ पिल्लांची काळजी घेतात.
THIS ANIMAL ADOPTS ORPHANED BABIES
esakal
या खारी एकमेकींचे आवाज ओळखू शकतात. त्यामुळे जवळच्या नात्यातील खारी कोणत्या आहेत, हे त्यांना समजतं.
THIS ANIMAL ADOPTS ORPHANED BABIES
esakal
एखाद्या मादी खारीचा मृत्यू झाल्यास तिच्या जवळच्या नात्यातील दुसरी मादी त्या पिल्लांची काळजी घेऊ शकते.
THIS ANIMAL ADOPTS ORPHANED BABIES
esakal
अनाथ पिल्लांना दत्तक घेण्याची ही घटना खूप दुर्मिळ आहे. अभ्यासातही अशी काही मोजकीच उदाहरणं आढळली आहेत.
THIS ANIMAL ADOPTS ORPHANED BABIES
esakal
प्राण्यांमध्येही कुटुंब आणि नात्यांची जाणीव असू शकते, याचं हे एक रंजक उदाहरण आहे.
THIS ANIMAL ADOPTS ORPHANED BABIES
esakal
LION VS TIGER PAW PRINTS
esakal