सिंधुदुर्गमधील रेडीचा गणपती: नवसाला पावणारे जागृत देवस्थान

Pranali Kodre

रेडीचा गणपती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक म्हणजे वेंगुर्ला तालुक्यातील रेडीचा गणपती. नवसाला पावणारे आणि जागृत देवस्थान म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे.

Redi Ganpati, Sindhudurg, Konkan

द्विभूज गणेश मंदिर

हे द्विभूज गणेश मंदिर असून १९७६ मध्ये स्वयंभू श्री गणेशाची द्विभूज मुर्ती प्रकट झाली, असे म्हटले जाते.

Redi Ganpati, Sindhudurg, Konkan

गणपतीची मूर्ती

जिथे ही मुर्ती प्रकट झाली, तिथेच मंदिर बांधण्यात आले. गणपतीची मूर्ती अतिशय देखणी आणि सुबक आहे.

Redi Ganpati, Sindhudurg, Konkan

भाविकांची गर्दी

दर संकष्टीला येथे भाविकांची गर्दी असते. तसेच गणपतीच्या दर्शनासाठी पर्यटक श्रद्धेने येतात.

Redi Ganpati, Sindhudurg, Konkan

मंदिराचे ठिकाण

सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर रेडी गाव आहे, तिथे बंदर किनाऱ्याजवळच लोह खनिज्याच्या खाणीच्या परिसरात हे मंदिर आहे.

Redi Ganpati, Sindhudurg, Konkan

जवळची पर्यटनस्थळं

शिरोडा, वेळागर समुद्रकिनारा, रेडी यशवंतगड, गोवा तेरेखोल किल्ला ही रेडीपासून जवळची पर्यटनस्थळं आहेत.

Shiroda, Sindhudurg, Konkan

निवासासाठी व्यवस्था

पावसाळ्याव्यतिरिक्त येथे पर्यटक कधीही येऊ शकतात. मात्र रेडी येथे राहण्यासाठी व्यवस्था नसल्याने शिरोडा, वेळाघर किंवा वेंगुर्ला येथे निवास करून रेडीला गणपती दर्शनासाठी येता येते.

Redi Ganpati, Sindhudurg, Konkan

जवळची स्थानके

रेडीला येण्यासाठी जवळचे बसस्थानक शिरोडा आहे, तर जवळचे रेल्वेस्थानक सावंतवाडी रोड आहे. पर्यटक खाजगी वाहनानेही येऊ शकतात.

Redi Ganpati, Sindhudurg, Konkan

रत्नागिरीतील नदीपात्रात असलेलं 'कर्णेश्वर शिवमंदिर'; जाणून घ्या इतिहास

Karneshwar Temple

|

Sakal

येथे क्लिक करा