वाढलेलं कोलेस्ट्रॉल कसं कमी करावं? फॉलो करा 'या' टिप्स अन् तुमचं हृदय ठेवा सुरक्षित!

Aarti Badade

कोलेस्ट्रॉल आणि तुमचं हृदय

रक्तातील वाढलेलं 'बॅड कोलेस्ट्रॉल'हृदयविकाराचा धोका वाढवतं. पण घाबरून जाऊ नका; योग्य आहार आणि जीवनशैलीत बदल करून तुम्ही ८ ते १२ आठवड्यांत हे नियंत्रणात आणू शकता.

Diet tips for high cholesterol

|

Sakal

फायबरचे सेवन वाढवा

ओट्स, बीन्स, मसूर, सफरचंद आणि नाशपाती यांसारख्या विरघळणाऱ्या फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. हे पदार्थ रक्तातील कोलेस्ट्रॉल शोषून घेण्यास मदत करतात.

Diet tips for high cholesterol

|

sakal

'वाईट चरबी' पूर्णपणे टाळा

"तूप, लोणी, चीज, नारळ तेल आणि पाम तेल यांसारखे सॅच्युरेटेड फॅट्स तसेच बिस्किटे किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ कमी करा. यामुळे नसांमधील अडथळा टाळता येतो.

Diet tips for high cholesterol

|

Sakal

निरोगी तेलांचा वापर करा

स्वयंपाकासाठी ऑलिव्ह ऑइल, शेंगदाणा तेल किंवा सोयाबीन तेलाचा वापर करणे फायदेशीर ठरते. ओमेगा-३ साठी आहारात अक्रोड, जळस आणि चिया सीड्सचा समावेश करा.

Diet tips for high cholesterol

|

sakal

दररोज ३० मिनिटे व्यायाम

वेगाने चालणे, पोहणे किंवा सायकलिंग यांसारखा व्यायाम दररोज किमान ३० मिनिटे करा. व्यायामामुळे शरीरातील गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते.

Diet tips for high cholesterol

|

Sakal

व्यसनमुक्ती आणि वजन नियंत्रण

धूम्रपान आणि मद्यपान पूर्णपणे बंद करा, कारण यामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते. तसेच, शरीराचे वजन नियंत्रित ठेवल्याने 'बॅड कोलेस्ट्रॉल' झपाट्याने कमी होते.

Diet tips for high cholesterol

|

SAKAL

प्रभावी घरगुती उपाय

रिकाम्या पोटी एका चमचा आवळ्याच्या रसात एक चमचा कोरफडीचा रस मिसळून घेतल्यास कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. तसेच प्राणायामामुळे मानसिक ताण कमी होतो.

Diet tips for high cholesterol

|

sakal

डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा

हे बदल करण्यासोबतच डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळोवेळी 'लिपिड प्रोफाईल' टेस्ट करा.

Diet tips for high cholesterol

|

sakal

मधुमेहाचा गंभीर इशारा! पायांवरील ‘या’ लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

Diabetic foot symptoms

|

Sakal

येथे क्लिक करा