Anushka Tapshalkar
बिया पोषणमूल्यांनी समृद्ध असून त्या जीवनसत्त्वे, खनिजे, हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स प्रदान करतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य, पचनशक्ती, प्रतिकारशक्ती आणि एकूणच आरोग्य सुधाारण्यास मदत होते.
चिया सीड्स वजन कमी करण्यासाठी एक उत्तम आणि प्रभावी उपाय आहे. यातील फायबर आणि इतर पोषणमूल्ये चयापचय सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे पुढील पद्धतींनी त्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
सकाळी भिजवलेल्या चिया सीड्सचे सेवन केल्याने तुमचे पोट भरलेले राहते आणि कॅलरी कमी होऊन आपल्याला ऊर्जा मिळते.
कमी कॅलोरी असलेली चिया सीड्सची स्मूदी पोषणमूल्यांची पातळी वाढवते आणि वजन कमी करण्यास मदत करते.
फायबर आणि प्रथिनांची संख्या वाढवण्यासाठी स्ट्रॉबेरी किंवा केळीसारख्या फळांसह दुधाच्या पुडिंगमध्ये चिया सीड्स घाला.
तुमच्या ओटमील मध्ये इतर टॉपिंग्स सह चिया बियांचा देखील वापर करा.
चिया बिया घालून तुमचे दही अधिक निरोगी बनवा. हे पचन आणि चरबी कमी करण्याची प्रक्रिया वाढवते.
चिया बिया पोषक असतात आणि वेगवेगळ्या लोकांसाठी वेगळ्या पद्धतीने काम करू शकतात.