Apurva Kulkarni
रेखा हिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर आपलं एक विश्व निर्माण केलं आहे.
दरम्यान रेखाचं आयुष्य एक रहस्यमय आयुष्य आहे. बॉलिवूडमध्ये तिच्याबाबत अनेक चर्चा रंगत असतात.
दरम्यान अमिताभनंतर रेखा एका अभिनेत्याच्या प्रेमाच अक्षरश: वेडी झाली होती. ती त्याच्यासाठी वाट्टेल ते करायला तयार होती.
रेखाला आणि त्या अभिनेत्याला त्याच्या होणाऱ्या बायकोनं एकत्र रंगेहात पकडलं होतं.
हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अक्षय कुमार आहे. अक्षय कुमार आणि रेखा एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात वेडे होते.
खिलाडी चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान दोघांमध्ये प्रेम झालं. रेखा आणि अक्षयने चित्रपटात काही इंटिमेंट सीन्स दिल्यामुळे दोघे एकमेकांच्या जवळ आले.
रेखा अक्षयच्या प्रेमात इतकी बुडाली होती की, सेटवर त्याच्यासाठी खास टिफिन बनवून आणत होती.
जेव्हा रेखा आणि अक्षय एकमेकांच्या जवळ येत होते. त्यावेळी अक्षयचं आणि रविना टंडनचं अफेअर सुरु होतं. त्यामुळे अनेकवेळा त्यांच्यात रेखावरुन वाद सुद्धा झाले.