Apurva Kulkarni
'छावा'मध्ये औरंगजेब साकारणाऱ्या अक्षय खन्नाबद्दल संतोष जुवेकर म्हणाला, 'त्याच्याशी बोलायची इच्छाच झाली नाही.' पण अक्षय स्वतःच सेटवर फारसा बोलत नाही..
अक्षय खन्ना मीडिया आणि चाहत्यांपासून लांब राहतो. त्याला प्रसिद्धी आवडत नाही. त्याला 'अदृश्य' राहणं जास्त आवडतं.
अक्षय म्हणतो, 'मी फक्त चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी मीडियासमोर येतो. बाकी वेळ मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात रमतो.'
'मी अनेक चित्रपट पाहतो, भरपूर वाचन करतो, कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवतो. झोपही पूर्ण घेतो,' असं त्याने म्हटलंय.
'वाईट चित्रपट करण्यापेक्षा घरी बसणं चांगलं. मी माझ्या कारकिर्दीबाबत समाधानी आहे,' असं अक्षय खन्नाचं स्पष्ट मत आहे.
काही मोजके लोकच चित्रपटसृष्टीत स्थान मिळवतात. टिकून राहणंही सोपं नाही, त्यामुळे अक्षय स्वतःला भाग्यवान समजतो.
इतर अभिनेत्यांप्रमाणे निर्मिती किंवा दिग्दर्शनात अक्षय खन्नाला रस नसल्याचं त्याचं म्हणणं आहे.
'ताल', 'बॉर्डर', 'दिल चाहता है' यांसारख्या हिट चित्रपटांत झळकूनही अक्षय खन्ना इंडस्ट्रीत एक 'गूढ अभिनेता' म्हणून ओळखला जातो.
अक्षय खन्ना कोणत्याही वादात अडकत नाही. तो सोशल मीडियावरही सक्रिय नाही. त्याला फक्त त्याच्या अभिनयावर लक्ष केंद्रित करायचं आहे!