kimaya narayan
बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेत्री असलेली म्हणजे रेखा. आजही त्यांच्या सौंदर्याचे अनेकजण फॅन आहेत.
त्यांचं याही वयातील असलेलं निखळ सौंदर्य आजही अनेकांना भुरळ घालत. आजही त्यांची क्रेझ प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळाले.
एकेकाळी रेखा या बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. पण तुम्हाला माहितीये का ? ही ओळख मिळवण्यासाठी त्यांना बरेच कष्ट घ्यावे लागले. खूप त्रास सहन करावा लागला.
बोल्ड अभिनेत्री म्हणूनही त्यांनी बॉलिवूडमध्ये ओळख मिळवली होती. पण करिअरच्या सुरुवातीला त्यांना धक्कादायक प्रकाराला सामोरं जावं लागलं.
रेखा यांनी बालकलाकार म्हणून अभिनय करण्यास सुरुवात केली. त्या पंधरा वर्षाच्या असताना अभिनेत्री म्हणून त्यांना पहिला सिनेमा ऑफर झाला ज्याचं नाव होतं अंजना सफर. या सिनेमात त्यांचे नायक होते बिश्वजीत चॅटर्जी जे रेखापेक्षा 17 वर्षांनी मोठे होते.
दिग्दर्शकाने रेखा यांच्या अनभिज्ञतेचा फायदा घेऊन सिनेमात किसिंग टाकला. बिश्वजीत यांनी दिग्दर्शकांच्या सांगण्यावरून पाच मिनिटे जबरदस्ती किस केलं. त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकले नाहीत.
या प्रकारामुळे रेखा खूप घाबरल्या. त्या रडू लागल्या आणि या प्रकाराचा त्यांना खूप मोठा धक्का बसला.
यावर अभिनेत्याने दिग्दर्शकाच्या सांगण्यावरूनच सीन केल्याचं स्पष्टीकरण नंतर दिलं. तसंच सीन हिट झाला तर त्यावर आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही असं म्हटलं.