सकाळ डिजिटल टीम
सण आणि व्रते ही आपण अनेक वर्षांन पासुन साजरी करत आलो आहोत.
या सण आणि व्रतांची उत्पत्ती कशी झाली तुम्हाला माहित आहे का?
सण, उत्सव, व्रत यांची उत्पत्ती कशी झाली या बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
पुर्वी रानटी अवस्थेत मानव हा टोळी करून राहात असे. नंतर जसजसा काळ पुढे जात राहिला तसा मानव गट करून राहू लागला. पुढे पुढे असे सर्व गट मिळून समाज बनला.
अशा समाजातूनच जाती, उपजाती यांचा उदय झाला, समाजाच्या गरजा वाढत गेल्या. संघर्ष होत राहिले.
म्हणून समाजाला एकत्र बांधून ठेवण्याकरता धर्माचा उदय होऊन धार्मिक आचरणासाठी सण, उत्सव, व्रते यांचा जन्म झाला.
पंचमहाभूतांची पूजा म्हणूनही अनेक उत्सव, सणांची उत्पत्ती झाली, वैदिक काळापासून यज्ञ, होम - हवन इत्यादी धार्मिक कृत्यांतून वैयक्तिक व कौटुंबिक सुखप्राप्तीचा हेतू मनात ठेवून अशी व्रते, सण, उत्सव यांचा उदय होत गेला.
आपल्या पूर्वजांनी अशा सर्व सणांची, उत्सवाची, व्रतांची सांगड नैसर्गिक घडामोडी, काळ, ऋतू, सुगी यांच्याशी चपखलपणे घातली.
प्राचीन हिंदू धर्माला इतिहास असून त्या काळाच्या पुरुषप्रधान समाजात स्त्रीचे स्थान दुय्यम होते. घर, मुले सांभाळण्यातच तिचे सर्व आयुष्य व्यतीत होते.