पुण्यातील हे मंदिर तब्बल २०० वर्षे जुनं! नावामागची कहाणी जाणून घ्या

Aarti Badade

पेठेत दडलाय इतिहास

सदाशिव पेठेतील बाजीराव रस्त्याजवळ, महाराणा प्रताप उद्यान परिसरात हे ऐतिहासिक मंदिर आहे. आजही हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

History of Bhikardas Maruti Temple in Sadashiv Peth

|

Sakal

पेशवेकालीन काळाशी इतिहास

इतिहासाच्या नोंदीनुसार, सुमारे १८१० च्या काळात बाजीराव पेशवा द्वितीय यांच्या कारकिर्दीत या मारुतीची नोंद आढळते. त्यामुळे मंदिराला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे.

History of Bhikardas Maruti Temple in Sadashiv Peth

|

Sakal

‘भिकारदास मारुती’ नाव कसं पडलं?

पूर्वी या परिसरात भिकारदास नावाच्या व्यक्तीचा बंगला आणि मोठी बाग होती. या बागेजवळ मारुतीची मूर्ती असल्याने त्यांच्या नावावरून मंदिराला ‘भिकारदास मारुती’ असे नाव मिळाल्याचे सांगितले जाते.

History of Bhikardas Maruti Temple in Sadashiv Peth

|

Sakal

कधी काळी इथे होती मोठी बाग!

आजचा सदाशिव पेठ परिसर गजबजलेला दिसतो. मात्र पूर्वी या भागात मोठ्या बागा आणि मोकळ्या जागा होत्या. भिकारदास यांची बाग टिळक रोड, नातू बाग आणि पर्वती तळ परिसरातील भागात असल्याची नोंद आहे.

History of Bhikardas Maruti Temple in Sadashiv Peth

|

Sakal

मंदिरातील मारुतीची मूर्तीही खास

येथील मारुतीची मूर्ती दक्षिणमुखी असून ती सुमारे तीन ते साडेतीन फूट उंच आहे. मूर्ती उभी असून हनुमानाची मान उजव्या बाजूला किंचित झुकलेली दिसते.

History of Bhikardas Maruti Temple in Sadashiv Peth

|

Sakal

मूर्तीच्या डोळ्यांमध्ये जाणवतं वेगळेपण!

या मारुतीच्या डोळ्यांमध्ये जिवंतपणा जाणवतो, अशी भावना अनेक भाविक व्यक्त करतात. त्यामुळे या मंदिराबद्दल भाविकांच्या मनात विशेष श्रद्धा आहे.

History of Bhikardas Maruti Temple in Sadashiv Peth

|

Sakal

मंदिरासमोर ऐतिहासिक मंदिर

भिकारदास मारुती मंदिराच्या समोरच सदावर्ते राम मंदिर आहे. या मंदिरात रामपंचायतनाची मूर्ती असून, गोंदवलेकर महाराज येथे येत असत, अशी स्थानिक परंपरा सांगते.

History of Bhikardas Maruti Temple in Sadashiv Peth

|

Sakal

आजही कायम आहे मंदिराची परंपरा

सदाशिव पेठेतील गजबजाटातही भिकारदास मारुती मंदिराने आपली ऐतिहासिक ओळख जपली आहे. विशेषतः शनिवारी येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.

History of Bhikardas Maruti Temple in Sadashiv Peth

|

Sakal

२०० वर्षांचा इतिहास अन् पुणेकरांची श्रद्धा!

सुमारे २०० ते २१५ वर्षांचा इतिहास असलेले हे मंदिर पुण्याच्या धार्मिक आणि ऐतिहासिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे.

History of Bhikardas Maruti Temple in Sadashiv Peth

|

Sakal

गरुड जोडीदाराची निवड कशी करतो?

eagle partner

|

Sakal

येथे क्लिक करा