स्वप्नपूर्तीचे एक वर्ष: जेव्हा भारताच्या लेकी ठरलेल्या वर्ल्ड चॅम्पियन

Pranali Kodre

२ नोव्हेंबर २०२५

बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजेच २ नोव्हेंबर २०२५ रोजी, नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्ड कप जिंकला होता.

India's Historic Women’s World Cup Glory

|

Sakal

स्वप्न अखेर सत्यात उतरलं

अनेक दशकांपासून पाहिलेलं स्वप्न अखेर सत्यात उतरलं आणि दोनवेळा हुलकावणी देणारं विश्वविजेतेपद अखेर भारतीय महिला संघाने मिळवलं होतं.

India's Historic Women’s World Cup Glory

|

Sakal

विश्वविजेतेपद

२०१७ च्या जिव्हारी लागणाऱ्या पराभवाची वेदना मागे टाकत, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील या संघाने सात वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलमध्ये धूळ चारली आणि मग फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव केला.

India's Historic Women’s World Cup Glory

|

Sakal

शफाली आणि दीप्तीचे अर्धशतक

फायनलमध्ये शफाली वर्माच्या ८७ धावा आणि दीप्ती शर्माच्या ५८ धावांच्या जोरावर भारताने २९८ धावांचा डोंगर उभा केला.

India's Historic Women’s World Cup Glory

|

Sakal

दक्षिण आफ्रिकेचा डाव २४६ धावांवर संपला

त्यानंतर गोलंदाजीतही या दोघींनी कमाल केली. दीप्ती शर्माने पाच, तर शफालीने दोन विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेचा डाव २४६ धावांवर गुंडाळला.

India's Historic Women’s World Cup Glory

|

Sakal

आनंदाश्रू

शेवटची विकेट पडताच मैदानावर एकच जल्लोष झाला. हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज यांच्यासह संपूर्ण संघाच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते.

India's Historic Women’s World Cup Glory

|

Sakal

अमोल मुजुमदार यांचं मार्गदर्शन

या ऐतिहासिक यशामागे खेळाडूंची जिद्द, संघाचं सांघिक योगदान आणि मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांचं मार्गदर्शनही महत्त्वाचं ठरलं.

India's Historic Women’s World Cup Glory

|

Sakal

एक वर्ष पूर्ण

आज या ऐतिहासिक विजयाला एक वर्ष पूर्ण होत आहे. एक असं स्वप्न, ज्यासाठी अनेक पिढ्यांनी प्रतीक्षा केली. एक असा क्षण, ज्याने भारतीय महिला क्रिकेटचा इतिहासच बदलून टाकला.

India's Historic Women’s World Cup Glory

|

Sakal

मुंबई इंडियन्सला रोहित शर्मा पुन्हा कर्णधार म्हणून का हवा?

Rohit Sharma Set for Mumbai Indians Captaincy Return?

|

Sakal

येथे क्लिक करा