सकाळ डिजिटल टीम
प्रजासत्तकदिन साजरा करत असताना घर किंवा ऑफिसमध्ये सोपी आणि सुंदर रांगोळी डिझाईन्स काढा. 26 जानेवारी हा भारताच्या राज्यघटनेचा दिवस आहे.
तिरंग्याचे रंग वापरून सुंदर रांगोळी डिझाईन तयार करा. विशेषत: मुलांसाठी ही डिझाईन त्यांच्या मनात राष्ट्रध्वजाबद्दल आदर निर्माण करेल.
आपण रांगोळीच्या मध्यभागी एक सैनिक काढू शकता. जर आपल्याला रांगोळीने सैनिक काढायला जमत नसेल तर, खडूने सैनिक काढा, आणि त्यात रंग भरा.
प्रजासत्तकदिनाच्या दिवशी भारताचा सुंदर नकाशा रांगोळीत बनवा. केशरी, हिरवा, आणि पांढरा रंग भरून ते आकर्षक दिसेल. दिवे आणि फुलांच्या सजावटीने त्याला अजून सुंदर बनवा.
मोर हा आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. रांगोळीत तीन रंगांचा मोर तयार करा. हा डिझाईन कोणत्याही शाळा, कॉलेज किंवा ऑफिस कार्यक्रमासाठी काढू शकता
प्रजासत्तकदिनाच्या विशेष दिवशी सोपी, वेगळी आणि आकर्षक रांगोळी डिझाईन्स तयार करा, ज्यामुळे वातावरण अधिक खास होईल.
तुम्ही तिरंग्याच्या रंगांचा वापर करून फुलांची रांगोळी डिझाईन करू शकता. या डिझाईनमध्ये तिरंगा रंगांचा सुंदर मिश्रण आणि फुलांची सजावट तुमच्या रांगोळीस एक खास रूप देईल.