Sandeep Shirguppe
अनेकांना गोड खायला आवडतं, साखर खाल्ल्याने (sugar) आपल्या शरीराला फायदा होत नाही.
जास्त गोड किंवा साखरेचे अतिसेवन (side effects of sugar) केल्याने अनेक आजार आपल्याला होऊ शकतात.
वजन वाढणे, रक्तातील साखर वाढणे, दात किडणे आणि उच्च रक्तदाब यासारखे आजार वाढतात.
अतिप्रमाणात साखर खाल्ल्यास याचा थेट परिणाम त्वचेवर होतो, यामुळे वृद्धत्व लवकर येऊ शकतं.
जास्त साखर किंवा मिठाईचे सेवन केल्याने शरीरातील ऊर्जेची पातळी कमी होते, यामुळे थकवा येतो.
चॉकलेट, मिठाई किंवा साखरेचे जास्त सेवन केल्याने वजन वेगाने वाढू लागते.
आहारातील अतिरिक्त साखरेचे सेवन केल्यास याचा थेट परिणाम आपल्या मूडवर होतो. यामुळे चिडचिड वाढते.
साखरेचे जास्त सेवन करणे आणि संधिवात होण्याचा धोका वाढतो, एका संशोधनातून समोर आले आहे.
अशक्तपणा आणि चिडचिड यामुळे झोपेवरही परिणाम होतो. जास्त गोड खाल्ल्याने झोपेवर वाईट परिणाम होतो.