DIY Denim Crafts: फेकू नका जुनी जीन्स! घरबसल्या तयार करा या 6 उपयोगी आणि क्रिएटिव्ह वस्तू

Monika Shinde

जुनी जीन्स

घरात जुनी जीन्स पडून आहे? मग फेकण्याआधी थांबा! थोड्या कल्पकतेने तुम्ही जुन्या जीन्सपासून घरीच अनेक उपयोगी आणि स्टायलिश वस्तू तयार करू शकता.

मोबाईल स्टँड

मोबाईल किंवा टॅबलेट हातात धरून कंटाळा येतो? जुनी जीन्स वापरून मजबूत मोबाईल स्टँड बनवा. फोन सुरक्षित राहतो आणि स्क्रॅचही पडत नाहीत.

स्टाइलिश कुशन कवर

मऊ डेनिमपासून तयार करा आकर्षक कुशन कव्हर. जीन्सच्या पॉकेट्स वापरून रिमोट किंवा मोबाईल ठेवण्याची सोयही करता येते.

किचनसाठी मजबूत एप्रन

स्वयंपाक करताना कपडे खराब होतात? जुनी जीन्स वापरून टिकाऊ आणि स्टायलिश एप्रन बनवा. पॉकेट्समुळे किचनमध्ये काम करणे सोपे जाते.

ट्रेंडी बॅग

जुन्या जीन्सपासून पाउच, स्लिंग बॅग किंवा मेकअप बॅग तयार करा. या बॅग्स दिसायला सुंदर असतात आणि दैनंदिन वापरासाठी खूपच उपयुक्त ठरतात.

टेबल मॅट आणि कोस्टर

डेनिम कापडापासून टेबल मॅट आणि कप कोस्टर बनवता येतात. हे टिकाऊ असतात आणि टेबलला गरम भांड्यांपासून संरक्षण देतात.

पाळीव प्राण्यांसाठी खेळणी

पाळीव प्राण्यांसाठी सुरक्षित खेळणी हवीत? जुनी जीन्स वापरून बॉल, दोरी किंवा उशीसारखी खेळणी बनवा. यामुळे कुत्रा किंवा मांजर घरातील इतर वस्तूं चालवण्यापासून दूर राहतात

Early Cancer Symptoms: कॅन्सर अचानक होत नाही! महिनाभर आधी शरीर देतं धोक्याचं संकेत...

येथे क्लिक करा