सकाळ डिजिटल टीम
अनेक घरांमध्ये किंवा हॉटेलमध्ये एकदा तळण झालेले तेल पुन्हा गरम करून वापरले जाते. पैशांची बचत करण्यासाठी केलेली ही कृती तुमच्या आरोग्याला महागात पडू शकते. तेल वारंवार गरम केल्याने त्यात रासायनिक बदल होतात, जे शरीरासाठी अत्यंत घातक असतात.
Reused Cooking Oil
esakal
तेल वारंवार तापवल्यामुळे त्यातील 'सॅच्युरेटेड फॅट्स' वाढतात. यामुळे शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलची पातळी वाढते आणि पर्यायाने हृदयविकाराचा झटका किंवा रक्तदाबाचे विकार उद्भवू शकतात.
Reused Cooking Oil
esakal
तेलातील अँटी-ऑक्सिडंट्स नष्ट होऊन त्यात कर्करोगजन्य घटक तयार होतात. यामुळे विशेषतः पोट, पित्ताशय आणि यकृताच्या कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
Reused Cooking Oil
esakal
तेलाचा पुनर्वापर केल्यामुळे पचनशक्तीवर परिणाम होतो. यामुळे पोटदुखी, गॅसेस, ॲसिडिटी आणि जळजळ अशा समस्या जाणवू लागतात.
Reused Cooking Oil
esakal
तेल पुन्हा पुन्हा गरम केल्यास त्यात फ्री रॅडिकल्स, ट्रान्स फॅट्स आणि पॉलिमरिक सारखे विषारी घटक तयार होतात. हे घटक शरीरातील चांगल्या पेशींवर हल्ला करून त्यांना नष्ट करतात.
Reused Cooking Oil
esakal
वारंवार गरम केल्याने तेलाची चव, रंग आणि गुणवत्ता पूर्णपणे संपते. अशा तेलात तळलेले पदार्थ शरीराला पोषण देण्याऐवजी आजारी पाडतात.
Reused Cooking Oil
esakal
एकदा वापरलेले तेल जर पुन्हा वापरायचेच असेल, तर ते जास्तीत जास्त एकदाच वापरा आणि वापरण्यापूर्वी ते नीट गाळून घ्या. मात्र, आरोग्याच्या दृष्टीने ते वापरणे टाळलेलेच उत्तम!
Reused Cooking Oil
esakal
Babool Pods Benefits
esakal