Aarti Badade
इंदूरच्या कृष्णपुरा भागातील २५० वर्षांपूर्वीची पायऱ्यांची विहीर कचऱ्याखाली गाडली होती. आता ती नव्या रूपात समोर आली आहे!
वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेली ही ऐतिहासिक विहीर कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली हरवली होती.
ही विहीर अहिल्याबाई होळकरांनी १८व्या शतकात बांधली. त्यांच्या स्थापत्यदृष्टीचे हे एक सुंदर उदाहरण आहे.
'जल गंगा अभियान' अंतर्गत या विहिरीचे पुनरुज्जीवन करण्यात आले. यात स्वच्छता, सौंदर्यीकरण आणि संरक्षणाचा समावेश आहे.
स्थानिक प्रशासन, इतिहासप्रेमी आणि नागरिकांनी एकत्र येऊन विहिरीची मूळ ओळख परत आणली.
पूर्वी अंधारात झाकलेली ही विहीर आता सजवलेली, सुरक्षित आणि आकर्षक ठिकाण बनली आहे.
या विहिरीची पायऱ्यांची रचना, दगडी बांधकाम आणि स्थापत्यशैली मराठा काळाची आठवण करून देते.
ही केवळ विहीर नसून इंदूरच्या पारंपरिक जलसंधारण व्यवस्थेचा जिवंत पुरावा आहे.
पुनर्स्थापनेनंतर ही जागा पर्यटन आणि ऐतिहासिक जाणीव यांचं केंद्र ठरली आहे.