महागड्या स्क्रबला पर्याय? तांदळाच्या पिठाचा हा घरगुती उपाय एकदा वापरून पाहा!

Aarti Badade

घरच्या घरी मिळवा फ्रेश लूक!

चेहऱ्यावर छान ग्लो हवा असेल, तर पार्लरमध्ये जाण्याऐवजी घरातील तीन पदार्थांपासून सोपा स्क्रब तयार करू शकता.

glowing skin

|

Sakal

स्क्रबसाठी लागणारे साहित्य

हा स्क्रब तयार करण्यासाठी एक चमचा तांदळाचे पीठ, एक चमचा मध आणि एक चमचा ताजे दही घ्या.

glowing skin

|

Sakal

स्क्रब कसा तयार कराल?

एका स्वच्छ वाटीत तांदळाचे पीठ, मध आणि दही एकत्र करून गुळगुळीत पेस्ट तयार करा.

glowing skin

|

Sakal

चेहऱ्यावर असा करा वापर

अंघोळीपूर्वी चेहरा स्वच्छ धुऊन स्क्रब चेहरा आणि मानेवर लावा व बोटांनी हलक्या हाताने गोलाकार मसाज करा.

glowing skin

|

Sakal

फक्त २ ते ३ मिनिटे ठेवा!

स्क्रब लावल्यानंतर २ ते ३ मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या आणि त्वचा जोरात घासणे टाळा.

Glowing Skin Face Pack

|

Sakal

स्क्रब वापरण्याचे फायदे

तांदळाचे पीठ मृत त्वचापेशी दूर करण्यास, तर मध आणि दही त्वचेला मऊपणा व तजेला देण्यास मदत करू शकतात.

glowing skin

|

Sakal

स्क्रब वापरताना ही काळजी घ्या!

स्क्रबनंतर मॉइश्चरायझर लावा, आधी पॅच टेस्ट करा आणि संवेदनशील त्वचा किंवा जळजळ असल्यास हा स्क्रब वापरणे टाळा.

glowing skin

|

Sakal

थंडी, प्रदूषण अन् फुफ्फुसांचा संसर्ग; निमोनियाची सुरुवातीची लक्षणे कोणती?

coughing

|

Sakal

येथे क्लिक करा