ग्लोइंग स्किनसाठी तांदळाचे पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे!

सकाळ डिजिटल टीम

पारंपरिक सौंदर्य रहस्य

आशियाई देशांमध्ये शतकानुशतके सौंदर्यासाठी वापरले जाणारे तांदळाचे पाणी त्वचेला फक्त वरूनच नाही, तर आतून पोषण देते. यामध्ये जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडंट्स आणि अमिनो ॲसिड मुबलक प्रमाणात असतात.

Traditional Beauty Secret

|

sakal 

त्वचेचा ओलावा टिकवून ठेवते

तांदळाच्या पाण्यात नैसर्गिक स्टार्च आणि सेरामाइड्स असतात. हे घटक त्वचेचा नैसर्गिक थर मजबूत करतात, ज्यामुळे त्वचेतील ओलावा बाहेर पडत नाही आणि त्वचा कोरडी पडत नाही.

Retains Skin Moisture

|

sakal 

वाढत्या वयाच्या खुणा रोखते

या पाण्यात फेरुलिक ॲसिड आणि गॅमा-ओरिझानॉलसारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक चेहऱ्यावरील सुरकुत्या,बारीक रेषा कमी करून त्वचा तरुण ठेवण्यास मदत करतात.

Prevents Signs of Aging

|

sakal 

डाग आणि पिगमेंटेशन कमी होते

तांदळाचे पाणी नियमित प्यायल्याने मेलेनिनचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होऊन त्वचेचा रंग एकसारखा आणि चमकदार दिसतो.

Reduces Spots and Pigmentation

|

sakal 

जळजळ आणि पिंपल्स शांत करते

अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म - त्वचेवर लालसरपणा, पिंपल्स किंवा जळजळ होत असल्यास.यातील अलँटोइन (Allantoin) नावाचा घटक त्वचेची जळजळ शांत करतो.

Soothes Inflammation and Pimples

|

sakal 

कोलाजनची निर्मिती वाढवते

निरोगी त्वचेसाठी कोलाजन आवश्यक असते. अभ्यासानुसार, तांदळाच्या पाण्यातील घटक कोलाजनचे संरक्षण करतात आणि नवीन कोलाजन तयार करण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचा घट्ट राहते.

Boosts Collagen Production

|

sakal 

तांदळाची स्वच्छता आणि कोणी हे पाणी पिणे टाळावे?

गरोदर महिला ( आर्सेनिकच्या धोक्यामुळे), मधुमेहाचे रुग्ण (स्टार्चमुळे साखर वाढू शकते), पचनाचा त्रास असलेले लोक (गॅस किंवा अपचन टाळण्यासाठी) यांनी टाळावे आणि तांदूळ एकदा स्वच्छ धुवून मगच पाणी वापरावे.

Rice Hygiene and Who Should Avoid Drinking This Water?

|

sakal 

डार्क सर्कल्स अन् सुरकुत्यांपासून सुटका हवी? 'हे' उपाय करून पाहा

dark circles 

|

sakal 

आणखी वाचा