सकाळ डिजिटल टीम
भारतातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत मुंबई अव्वल आहेच पण त्यच बरोबर इतर शहरांचे स्थान काय आहे जाणून घ्या.
Richest City in India
sakal
भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा जीडीपी (GDP) सुमारे ३१० अब्ज डॉलर (अंदाजे २५.७३ लाख कोटी रुपये) आहे. येथे आरबीआय, बीएसई आणि एनएसई सारख्या संस्थांची मुख्यालये असून सर्वाधिक अब्जाधीश याच शहरात राहतात.
Richest City in India
sakal
दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली असून याचा जीडीपी सुमारे २९३ अब्ज डॉलर आहे. हे शहर केवळ राजकीय केंद्र नसून आयटी, टेलिकॉम आणि किरकोळ व्यापाराचे मोठे हब आहे.
Richest City in India
sakal
पूर्वेकडील प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या कोलकात्याचा जीडीपी सुमारे १५० अब्ज डॉलर आहे. येथे पोलाद, खाणकाम आणि वस्त्रोद्योगाचे मोठे जाळे आहे.
Richest City in India
sakal
'सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरूचा जीडीपी ११० अब्ज डॉलर आहे. आयटी आणि स्टार्टअप क्षेत्रात हे शहर जगात प्रसिद्ध आहे.
Richest City in India
sakal
दक्षिण भारताचे हे शहर ऑटोमोबाईल उद्योगाचे केंद्र असून याचा जीडीपी सुमारे ७९ अब्ज डॉलर आहे. याला 'डेट्रॉईट ऑफ इंडिया' असेही म्हणतात.
Richest City in India
sakal
फार्मा आणि आयटी क्षेत्रातील प्रगतीमुळे हैदराबादचा जीडीपी ७५ अब्ज डॉलर पर्यंत पोहोचला आहे. मोत्यांचे शहर म्हणूनही याची ओळख आहे.
Richest City in India
sakal
महाराष्ट्रातील दुसरे महत्त्वाचे शहर असलेल्या पुण्याचा जीडीपी सुमारे ६९ अब्ज डॉलर आहे. ऑटोमोबाईल आणि आयटी क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे पुण्याची वेगाने प्रगती होत आहे.
Richest City in India
sakal
जगातील ९०% हिरे पॉलिश होणाऱ्या सुरत शहराचा जीडीपी सुमारे ६० अब्ज डॉलर आहे. हे शहर आशियातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे.
Richest City in India
sakal
Power Bank & Mobile Battery Explode
ESakal