सूर्यकुमार मुंबई इंडियन्ससाठी 'हा' पराक्रम करणारा पहिलाच! सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला

Pranali Kodre

क्वालिफायर २

आयपीएल २०२५ स्पर्धेत पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात क्वालिफायर २ सामना झाला.

PBKS vs MI | Sakal

सूर्यकुमार यादवची खेळी

या सामन्यात मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवने २६ चेंडूत ४४ धावांची खेळी केली.

Suryakumar Yadav IPL 2025 | Sakal

७००+ धावा

त्यामुळे सूर्यकुमार यादवने आयपीएल २०२५ स्पर्धेत ७०० धावांचा टप्पा पार केला आहे.

Suryakumar Yadav IPL 2025 | Sakal

सूर्यकुमारच्या धावा

सूर्यकुमारने आयपीएल २०२५ मध्ये १६ सामन्यात ६५.१८ च्या सरासरीने ५ अर्धशतकांसह ७१७ धावा झाल्या आहेत.

Suryakumar Yadav IPL 2025 | Sakal

१० वा खेळाडू

तो आयपीएलमध्ये एका हंगामात ७०० धावा पार करणारा १० वा खेळाडू ठरला आहे.

Suryakumar Yadav IPL 2025 | Sakal

मुंबईचा पहिलाच खेळाडू

तसेच सूर्यकुमार मुंबई इंडियन्सकडून एका आयपीएल हंगामात ७०० हून अधिक धावा करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

Suryakumar Yadav IPL 2025 | Sakal

सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला

यापूर्वी एका आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने २०१० मध्ये १५ सामन्यात ६१८ धावा केल्या होत्या.

Suryakumar Yadav IPL 2025 | Sakal

दुसऱ्यांदा ६०० धावा पार

सूर्यकुमार मुंबई इंडियन्सकडून एका हंगामात ६०० हून अधिक धावा दोन वेळा करणाराही पहिलाच खेळाडू आहे. त्याने २०२३ आयपीएलमध्ये ६०५ धावा केल्या होत्या.

Suryakumar Yadav IPL 2025 | Sakal

आयपीएलच्या एका हंगामात 700+ धावा करणारे 9 धुरंधर

Sai Sudharsan | Sakal
येथे क्लिक करा