दररोज डार्क चॉकलेट खाण्याचे योग्य प्रमाण जाणून घ्या!

Aarti Badade

डार्क चॉकलेट

चॉकलेट म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. पण योग्य प्रमाणात खाल्ल्यास डार्क चॉकलेट शरीराला अनेक पोषक घटक आणि आरोग्यदायी फायदे देऊ शकते.

health benefits of dark chocolate

|

Sakal

पोषक घटकांचा खजिना

डार्क चॉकलेटमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक, तांबे, मँगनीज आणि सेलेनियम यांसारखी महत्त्वाची खनिजे आढळतात.

health benefits of dark chocolate

|

Sakal

जीवनसत्त्वे आणि फायबर

डार्क चॉकलेटमध्ये व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन E, बीटा-कॅरोटीन आणि नियासिन यांसारखी जीवनसत्त्वे असतात. यासोबतच प्रथिने आणि फायबरही मिळते, जे शरीरासाठी फायदेशीर ठरते.

health benefits of dark chocolate

|

Sakal

मेंदूसाठी फायदेशीर

डार्क चॉकलेटमधील नैसर्गिक घटक रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मूड सुधारण्यास मदत होऊ शकते. तणाव कमी करण्यासाठीही ते उपयुक्त मानले जाते.

health benefits of dark chocolate

|

Sakal

हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त

डार्क चॉकलेटमध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास त्याचा हातभार लागू शकतो.

health benefits of dark chocolate

|

Sakal

ऊर्जा आणि त्वचेसाठी लाभदायी

डार्क चॉकलेट शरीराला झटपट ऊर्जा देण्यास मदत करते. त्यातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेचे संरक्षण करण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यासही उपयुक्त ठरू शकतात.

health benefits of dark chocolate

|

Sakal

किती प्रमाणात खावे?

डार्क चॉकलेट पौष्टिक असले तरी त्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे महत्त्वाचे आहे. दररोज छोटा तुकडा पुरेसा मानला जातो.

health benefits of dark chocolate

|

Sakal

प्रमाणात खाणे

डार्क चॉकलेटचे फायदे मिळवण्यासाठी जास्त कोको असलेले (70% किंवा अधिक) डार्क चॉकलेट निवडा. कोणताही पदार्थ अति प्रमाणात खाणे टाळा.

health benefits of dark chocolate

|

sakal

योगामुळे खरंच वजन कमी होतं का?

Weight Loss Yoga

|

Sakal

येथे क्लिक करा