मन शांत अन् एकाग्र होण्यासाठी कमीत कमी किती वेळ ध्यान करावे?

Aarti Badade

शारीरिक आणि मानसिक

नियमित ध्यानधारणा केल्याने शरीराला गाढ आराम मिळतो, मूड सुधारतो आणि दैनंदिन जीवनातील तीव्र मानसिक तणाव झटक्यात कमी होतो.

Right time for meditation

|

Sakal

सकाळी ध्यान करणे सर्वात जास्त प्रभावी

सकाळी आजूबाजूचे वातावरण शांत असते आणि आपण ताजेतवाने असतो, ज्यामुळे मनावर नियंत्रण ठेवणे आणि एकाग्रता साधणे सोपे जाते.

Right time for meditation

|

Sakal

उपाशीपोटी ध्यान करण्याचा मुख्य नियम

तज्ज्ञांच्या मते नेहमी उपाशीपोटी ध्यान करावे; कारण जेवण केल्यानंतर ध्यान केल्यास शरीरात आळस निर्माण होऊन झोप येऊ शकते.

Right time for meditation

|

Sakal

ध्यानधारणेचा सर्वोत्तम दैनिक कालावधी

मानसिक स्थिरता आणि उत्तम एकाग्रतेसाठी दररोज सलग २० ते ३० मिनिटे शांत चित्ताने ध्यान करणे सर्वोत्तम मानले जाते.

Right time for meditation

|

Sakal

वेळेअभावी १० मिनिटांचे ३ छोटे सेशन्स

सलग वेळ मिळत नसल्यास तुम्ही दिवसभरात १०-१० मिनिटांचे ३ वेगवेगळे सेशन्स करू शकता, ज्याने मनाची शांती आणि कार्यक्षमता वाढते.

Right time for meditation

|

Sakal

लक्ष केंद्रित करण्यासाठी मंत्रोच्चाराची मदत

तसे ध्यान करताना शब्द उच्चारण्याची सक्ती नसते, मात्र 'ॐ' (ओम) सारख्या पवित्र शब्दाचा उच्चार केल्यास मन एकाग्र करण्यास मोठी मदत होते.

Right time for meditation

|

Sakal

उच्च रक्तदाब

नियमित ध्यानामुळे शरीरातील उच्च रक्तदाब (High BP) कमी होतो, मानसिक थकवा दूर होतो आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते.

Right time for meditation

|

Sakal

आला एकदाचा पाऊस! पुण्याजवळच्या 'या' 3 ठिकाणी निसर्गाचा स्वर्गीय अनुभव घ्या

monsoon travel

|

Sakal

येथे क्लिक करा