सकाळ डिजिटल टीम
सध्या राज्यभरात पावसाने थैमान घालायला सुरवात केलीये. पहिल्याच दिवशी पावसानं मुंबईला झोडपून काढलंय.
या अशाच वातावरणात अभिनेत्री रिंकू राजगुरू हिच्या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधलंय.
मराठी व हिंदी मनोरंजनसृष्टीतील प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री रिंकू राजगुरू कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते.
पहिल्या पावसाला सुरुवात झाली असतानाच रिंकूनं गच्चीवर काळ्या रंगाच्या साडीत आकर्षक फोटोशूट केलंय.
रिंकूनं या फोटोंसोबत "शीशे-की… तरह आर- पार हुं, फिर-भी-बहुतों की समझ के बाहर- हुं..!!!" असं कॅप्शन लिहिलंय.
या फोटोशूटसाठी रिंकूनं काळ्या रंगाची साडी निवडलीये, ज्यावर लाल रंगाची नक्षी आहे.
तिनं स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला असून तिचा हा लूक चाहत्यांना घायाळ करताना दिसत आहे.
गच्चीवर ढगाळ वातावरणात तिनं हे फोटो क्लिक केलेत.
अनेकांनी तिच्या फोटोंवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर केलेत.