Pranali Kodre
भारताचा स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंग काही दिवसांपूर्वीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला होता.
त्याने उत्तरप्रदेशमधील खासदार प्रिया सरोजसोबत साखरपुडा केल्याच्या अफवा पसरल्या होत्या. परंतु, दोघांच्या घरच्यांनी फक्त लग्नाच्या चर्चा सुरू आहेत, पण अद्याप कोणतेही विधी झाले नसल्याचे स्पष्ट केले होते.
पण आता त्यांचं लग्न दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने ठरलं असल्याचे समजत आहे.
रिंकू आणि प्रिया हे दोघे ८ जून रोजी साखरपूडा करणार आहेत. त्यांचा साखरपूडा लखनौमधील एका हॉटेलमध्ये होणार आहे.
रिंकू आणि प्रिया यांची ओळख काही वर्षांपूर्वी त्यांच्या एका कॉमन फ्रेंडच्या मार्फत झाली होती.
२६ वर्षीय प्रिया सरोज समाजवादी पार्टीची सदस्य असून दुसऱ्या क्रमांकाची सर्वात तरुण खासदार आहे.
ती उत्तर प्रदेशमधील नावाजलेले नेते तुफानी सरोज यांची मुलगी आहे.
प्रिया पेशाने वकिल आहे.