Pranali Kodre
आयपीएल २०२५ स्पर्धेच्या एलिमिनेटर सामन्यात ३० मे रोजी मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सविरुद्ध २० धावांनी रोमांचक विजय मिळवला.
पण या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि गुजरातचा कर्णधार शुभमन गिल हस्तांदोलन करताना दिसले नव्हते. तसा त्यांचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.
त्यामुळे हार्दिक आणि शुभमन यांच्यात काही वाद आहेत का, अशा चर्चांना सुरुवात झाली होती.
पण अखेर ३१ मे रोजी शुभमन गिलने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत याबाबत मौन सोडले आहे.
त्याने हार्दिक पांड्यासोबत हसतानाचे फोटो शेअर करताना कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट केले.
गिलेने पोस्टवर लिहिलं की 'बाकी काही नाही फक्त प्रेम' तसेच कंसात लिहिलं की 'इंटरनेटवर दिसणाऱ्या सर्वच गोष्टींवर विश्वास ठेवू नका.'
गिलची ही स्टोरी हार्दिक पांड्यानेही रिपोस्ट केली असून त्याने लिहिले की 'नेहमीच शुभू बेबी'(Always Shubhu Baby).
मुंबई इंडियन्सने गुजरातला पराभूत केल्याने ते आता क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला आहे. गुजरातचे मात्र आयपीएल २०२५ मधील आव्हान संपले.