Pranali Kodre
भारत आणि इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरमध्ये २३ जुलैपासून सुरू झाला.
मात्र, या सामन्याच्या पहिल्याच दिवशी ख्रिस वोक्सचा चेंडू रिषभ पंतला फलंदाजी करताना उजव्या तळपायाला जोरात लागला.
रिषभ दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतला होता. स्कॅनमध्ये त्याच्या तळपायाला फ्रॅक्चर असल्याचेही निदान झाले.
मात्र, संघाला गरज असल्याने रिषभ या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा फलंदाजीसाठी परतला. त्याने ५४ धावांची खेळीही केली.
दरम्यान, पंत असा पहिला खेळाडू नाही, जो जखमी झाल्यानंतरही संघासाठी मैदानात उतरला आहे. याआधी अशी हिंमत दाखवणाऱ्या काही खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.
२००९ मध्ये सिडनी कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा तत्कालीन कर्णधार ग्रॅमी स्मिथ हात फ्रॅक्चर असतानाही ११ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता.
२०१९ वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना हाताचा अंगठ्याला फ्रॅक्चर झालेले असतानाही शिखर धवनने फलंदाजी करत ११७ धावा केल्या होत्या.
भारताचा दिग्गज अनिल कुंबळे २००२ मध्ये वेस्ट इंडिजविरुग्ध दबडा तुटलेला असतानाही गोलंदाजी करण्यासाठी उतरला होता. त्याने बँडेज बांधून १४ षटके गोलंदाजी केली होती आणि ब्रायन लाराची महत्त्वाची विकेटही घेतली होती.
२०१८ आशिया कप स्पर्धेत मनगटाला फ्रॅक्चर असतानाही बांगलादेशचा तमिम इक्बाल श्रीलंकेविरुद्ध ११ व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता.
२०१० साली बांगलादेशविरुद्ध वनडे सामन्यात इंग्लंडचा इयान बेल पायाला फ्रॅक्चर झालेले असतानाही तो मैदानात उतरला होता.
वेस्ट इंडिजचे माल्कम मार्शल १९८४ साली इंग्लंडविरुद्ध हेडिंग्ले कसोटीत डाव्या हाताच्या अंगठ्याला दोन फ्रॅक्चर असतानाही फलंदाजीला आले होते. इतकंच नाही, तर उजव्या हाताचे गोलंदाज असल्याने त्यांनी गोलंदाजीही केली.
लाहोरला २००३ ला पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचे गॅरी कर्स्टन यांच्या तोंडावर शोएब अख्तरचा चेंडू आदळल्याने त्यांचे नाक फ्रॅक्चर झाले होते. पण त्यांनी तरीही फलंदाजी केली होती.