Pranali Kodre
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने नुकतेच सोशल मीडियावर विविध प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
१५ जानेवारीला एक्सवर (आधीचे ट्वीटर) त्याने 'खूप उत्तरे देण्यासाठी थोडा वेळ मिळाला आहे, तुमचे प्रश्न विचारा', अशी पोस्ट शेअर केली.
त्यानंतर त्याला एक्स युझर्सने अनेक प्रश्न विचारली, ज्याची उत्तरं त्याने दिली.
एका युझरने त्याला विचारले की क्रिकेटव्यतिरिक्त मिळालेल्या फावल्या वेळेत ऋषभ काय पाहातो?
या प्रश्नावर ऋषभ पंतने उत्तर दिले की तो ऑनलाईन गेम्स खेळतो आणि चित्रपट किंवा सिरीज पाहातो.
ऋषभ पंत आता ३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात खेळताना दिसणार आहे.
तो दिल्लीकडून सौराष्ट्रविरुद्धचा सामना खेळणार आहे. २०१७-१८ च्या हंगामानंतर पहिल्यांदाच पंत रणजी ट्रॉफीचा सामना खेळणार आहे.