सकाळ डिजिटल टीम
आयपीएल २०२५ काही संघांसाठी एक दुःस्वप्न ठरले कारण काही भारतीय खेळाडू त्यांना मिळालेल्या रकमे योग्या कामगिरी करू शकले नाहीत.
२७ कोटींचा रिषभ पंतपासून ते ९.७५ कोटींच्या रविचंद्रन अश्विनपर्यंत ५ महागड्या भारतीय खेळाडूंना अपयश आले
LSGने पंतसाठी २७ कोटी रुपये मोजले, परंतु त्याला १२ सामन्यांत १२.२७ च्या सरासरीने फक्त १३५ धावा केल्या आहेत.
KKR ने वेंकटेशला २३.७५ कोटी दिले, परंतु त्याला ११ सामन्यांत २०.२८ च्या सरासरीने फक्त १४२ धावा करता आल्या.
SRHने इशान किशनला ११.२५ कोटी रुपयांना खरेदी केलं आणि त्याला १२ सामन्यांमध्ये २५.६६ च्या सरासरीने फक्त २३१ धावा करता आल्या.
SRH ने शमीसाठी १० कोटी रुपये मोजले, परंतु ९ सामन्यांमध्ये त्याला फक्त ६ विकेट्स घेता आल्या आहेत.
CSK ने ९.७५ कोटी मोजलेल्या अश्विनला ९ सामन्यांमध्ये फक्त ७ विकेट्स घेता आल्या आहेत.
महागडी रक्कम देऊन खेळाडूंना ताफ्यात घेणाऱ्या LSG, SRH, CSK, KKR यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.