Swadesh Ghanekar
रोहित शर्मा ( ५) सकट मुंबईची आघाडीची फळी आज फार काही कमाल करू शकली नाही.
रायन रिकेल्टन ( २५) व विल जॅक्स ( २१) यांना शांत ठेवण्यात दिल्लीच्या गोलंदाजांना यश आले.
तिलक वर्मा व सूर्यकुमार यादव हेही सुरुवातीला चाचपडताना दिसले. तिलक २७ धावा करून बाद झाला.
सूर्याने शेवटच्या षटकांत दमदार फटकेबाजी केली. त्याने ४३ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारांसह ७३ धावांची खेळी केली.
नमन धीरने ८ चेंडूंत २४ धावा कुटल्या. मुंबईने ५ बाद १८० धावांपर्यंत मारली मजल.
सूर्याने सलग १३ ट्वेंटी-२० सामन्यांत २५+धावा करण्याचा विश्वविक्रम केला. टेम्बा बवुमाच्या नावावर हा विक्रम आहे.
सूर्याने मागील १३ डावांत २९, ४८, २७, ६७, २८, ४०, २६, ६८, ४०, ५४, ४८, ३५, ७३ अशा धावा केल्या आहेत.
ब्रॅड हॉज, जॅक रुडॉल्फ, कुमार संगकारा, ख्रिस लिग व कायले मेयर्स यांनी सलग ११ सामन्यांत अशी खेळी केली आहे.
सूर्याने ३२१ ट्वेंटी-२० सामन्यांत ६ शतकं व ५७ अर्धशतकांसह ८४१३ धावा केल्या आहेत.