Aarti Badade
युरिक अॅसिड हा शरीरातील टाकाऊ पदार्थ आहे. त्याची निर्मिती ही सामान्य जैविक प्रक्रिया आहे. तो शरीरातून बाहेर टाकण्याचे काम मूत्रपिंड करतं.
जेव्हा मूत्रपिंड युरिक अॅसिड योग्यरित्या बाहेर टाकू शकत नाही, तेव्हा ते सांध्यांमध्ये साठते. त्यामुळे वेदना, सूज आणि गाउटसारख्या समस्या होतात.
आयुर्वेदिक तज्ज्ञ सांगतात की दररोज घरच्या घरी तयार केलेले एक पेय युरिक अॅसिड कमी करू शकते.
हे पेय बनवण्यासाठी फक्त २ घटक लागतात – एक चमचा सेलेरी, एक चमचा किसलेले आले.
एक ग्लास पाण्यात आले आणि सेलेरी टाका. ते मिश्रण ५-७ मिनिटं उकळा आणि नंतर थंड होऊ द्या. नंतर गाळून घ्या.
सकाळी नाश्त्यानंतर अर्धा ग्लास, रात्री जेवणानंतर अर्धा ग्लास दररोज नियमितपणे हे प्या.
युरिक अॅसिडची पातळी कमी होते,सांधेदुखी आणि सूज कमी होते,शरीरातील जळजळ कमी होते
हा उपाय आयुर्वेदावर आधारित आहे. वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.