Aarti Badade
प्रसूतीनंतर आईचं शरीर अशक्त झालेलं असतं. योग्य आहार घेतल्यास शरीर लवकर बरे होतं आणि बाळालाही फायदा होतो.
बाळंतशोपा, काळे जिरे, गूळ यांचा उपयोग केल्यास गर्भाशय आकुंचन पावतो आणि दूध येण्यास मदत होते.
शरीराची झीज भरून काढण्यासाठी सुंठ आणि गूळ घालून बनवलेल्या वड्या खाव्यात.
काजू, बदाम, डिंक, मखाने, खसखस यांचा वापर करून बनवलेले लाडू आणि खीर शरीराला बळ देतात.
गूळ, काळे जिरे, सुंठ हे पदार्थ दूध वाढवण्यास उपयोगी ठरतात.
तिखट आणि वात वाढवणारे पदार्थ टाळावेत. त्याऐवजी गरम, ताजं आणि सात्म्याचं अन्न घ्यावं.
रात्रीचं अन्न उरलेलं खाणं टाळा. बाळंतिणीने नेहमी ताजं, उबदार अन्नच खावं.
आईने काय खाल्लंय त्याचा थेट परिणाम बाळाच्या पचन, झोप आणि आरोग्यावर होतो.
आयुर्वेदानुसार बाळंतिणीचा आहार हा शरीर व मन दोन्ही सशक्त करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो.
संतुलित, पारंपरिक आणि सकस आहार घेऊन आई आणि बाळ दोघंही निरोगी राहू शकतात.